आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम शाळेच्या विध्यार्थ्यांनी निवडणूक यंत्रणा तसेच त्याची कार्यपद्धती घेतल्या जाणून..

वर्गशिक्षक किरण बोरसे सर यांच्या संकल्पनेतून अभ्यासक्रमातील हा उपक्रम राबविण्यात आला

पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील वर्ग 8 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय भूगोल या अभ्यासक्रमात दिलेल्या फिल्ड व्हीजीट या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाची निवडणूक यंत्रणा तसेच त्याची कार्यपद्धती या संदर्भात आदरणीय तहसीलदार विजय बनसोडे साहेब यांच्याशी विद्यार्थ्यांनी निवडणूकिच्या कार्यप्रणाली बद्दल माहिती जाणून घेतली.

पाचोरा तालुका तहसीलदार विजय बनसोडे यांनी मतदान यंत्रणा कशी काम करते लोकशाही म्हणजे काय? लोकसभा तसेच विधानसभा काय असते राज्याचा प्रमुख कोण असतो स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक प्रक्रिया कशी असते. मतदार संघ कसा असतो कसा तयार केला जातो भारतात खासदार आमदार यांची निवड प्रक्रिया कशी असते लोकशाही पद्धत भारतात कशी अस्तित्वात आली. याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली तसेच निवडणूक नायब तहसीलदार  रणजीत पाटील साहेब तसेच संगणक तज्ञ जयंत जाधव साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व तहसीलमध्ये होणाऱ्या कामकाजाची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले.

सदर उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी, सचिव जिवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक  संजयजी चोरडिया, गुलाबजी राठोड, प्रभूलालजी शर्मा, गोपाल पटवारी, सौ प्रीतीजी जैन, महेंद्रकुमार हिरण,श्री अशोककुमारजी मोर, शेखरकुमार धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील मॅडम शाळेचे सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील,प्रतिभा मोरे, रूपाली जाधव, प्रीती शर्मा, शितल तिवारी, दीपिका रणदिवे, योगिता शेंडे, पूजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राह्मणकर, विद्या थेपडे, पिंकी जैन, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, संगीता पाटकरी, पूजा अहिरे, कल्पना बोरसे, वाल्मीक शिंदे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदीप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा,  मनोज बडगुजर, शिवाजी ब्राह्मणे, शिवाजी पाटील, अलका बडगुजर,अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनीषा पाटील, विकास मोरे यांचे सहकार्य लाभले. इयत्ता 8 वीचे वर्गशिक्षक किरण बोरसे सर यांच्या संकल्पनेतून अभ्यासक्रमातील हा उपक्रम तहसील कार्यालय पाचोरा येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे