ब्रेकिंगमहाराष्ट्र

भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोनाची लागण… ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु

शरण खन्ना

ठाणे (वृत्तसंस्था) : ठाणे येथे कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय कि काय असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. यातच सध्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन नव्या व्हेरिएंटनं सगळ्यांची चिंता वाढवली आहे. यातच भिवंडी तालुक्यातील पडघा येथील मातोश्री या वृद्धाश्रमातील जवळपास ६९ वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पडद्या जवळच्या खडवली येथे मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल ६९ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या वृद्धश्रमात १०० पेक्षा अधिक व्याधिग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले आहे. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यापासून काही जणांना ताप आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. एका वृद्धाचा ताप कमी ना आल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. हि चाचणी पॉझिटिव्ह आल्याने वृद्धाश्रमातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली. त्यावेळी ६९ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

नव्या व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. सरकारने सतर्क राहण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. कोरोनाचे नियम पाळण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कोरोनाची नवी नियमावली जाहीर केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे