दरेकर, महाजनांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून घ्या!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पा ही मारल्या
या शिवबंधन बांधूया
भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळया लगावल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा दुपारी विधानभवनातून बाहेर पडला. त्यावेळी विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. या चारही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या.




