आपल खान्देश

धुळ्यात ओबीसीच्या न्याय व विविध मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन..

धरणे आंदोलनास खान्देश तेली समाजमंडळाचे अनेक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थिती होते

  • झूम मराठी ऑनलाईन | धुळे 

धुळे (प्रतिनिधी) ओबीसी समाजांवर होणाऱ्या अन्यायाबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासोबत अनेकदा सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणतेही प्रकारची कार्यवाही होऊन न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित केलेल्या धरणे आंदोलनास खान्देश तेली समाजमंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन  जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे तयार करण्यात यावे, ओबीसी समाजांची जात निहाय जनगणना करण्यात यावी, नॉन क्रिमीलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी. अशा अनेक मागण्यांसाठी आज ओबीसी महासंघ व खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संयुक्तरित्या निवेदन देण्यात आले असून

सदर निवेदनाच्या प्रती महामाहीम राष्ट्रपती महोदय, मा. राज्यपाल महोदय, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांना मा.  जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत देण्यात आल्या. यावेळी ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे मार्गदर्शक पोपटराव डोंगर चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, भालचंद्र चौधरी सर, नंदुलाल रमेश चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी, सौ. मनीषा भालचंद्र चौधरी, शाम रामदास चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे