उत्तर प्रदेशच्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाच्या धर्तीवर आता केंद्रानेही लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता दोन पेक्षा जास्त अपत्यं जन्माला घातल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणं बंद होणार आहे. गोरखपूरचे भाजपचे खासदार रवी किशन हे लोकसंख्या नियंत्रणा खासगी विधेयक मांडणार आहेत. पण विशेष म्हणजे भाजपचे खासदार असलेल्या रवी शंकर यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत. रवी शंकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात ही माहिती नमूद केली आहे.
भाजपचे खासदार आणि लोकप्रिय भोजपूरी अभिनेते रवी किशन लोकसंख्या नियंत्रणासंबंधी संदर्भात एक खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती आहे. पुढच्या महिन्याच्या 6 ऑगस्टला त्यावर राज्यसभेत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
खासदार रवी किशन संसदेत लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार असल्याची माहिती समोर येताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. रवी किशनयांच्या प्रतिज्ञापत्रकात त्यांना चार अपत्यं आहेत असं नमूद असताना त्यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडावं हे म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
Gorakhpur MP Ravi Kishan will introduce a Private members bill on 23rd July in parliament on Population Control. What's interesting is he himself has 4 children. pic.twitter.com/8Z93GMgPVT
— Dr Gaurav Garg (@DrGauravGarg4) July 12, 2021


