ब्रेकिंग

Pachora Crimes | पाचोऱ्यात एका तरुणांचा चाकूने वार करत केला ‘खून’…!

पाचोरा | किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. १२ वाजुन १५ मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय – २०) रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा यास शहरातील बाहेरपुरा येथे पाचोऱ्यातील शिव कॉलनी येथील तरुणांने याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना स्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान हेमंत सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संशयीत तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात याचे विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे. रोहित लोणारी याने हेमंत सोनवणे याचा खुन किरोळ कारणावरुन केला असला तरी नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे