पाचोरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे
पाचोरा लाईव्ह
पाचोरा (प्रतिनिधी) येत्या १४ एप्रिल रोजी येणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शहरातील नागसेन नगर भागात नुकतीच समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कोरोनामुळे सलग दोन वर्षे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती मिरवणूक काढता न आल्याची व साजरी न करता आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या कारणाने यंदा अतिशय भव्य व द्विगुणित उत्साहात सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती नागसेन नगर व तसेच मिलिंद हौसिंग सोसायटी, संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर यांच्या एकमताने गठन करत अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली. तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी सर्वानुमाते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे तर उपाध्यक्ष : आकाश नन्नवरे ,अजय साळवे , दिपक खरे ,शुभम खर्चाने, सचिव मिलिंद तायडे, सहसचिव :- अमोल कदम, खजिनदार :- राजु सोनवणे, कार्याध्यक्ष -भैय्या खेडकर,



