भाजपा ओबीसी जागर अभियानाच्या रथयात्रेची सुरुवात ठाणे ग्रामीण मधून
Published by Yogesh Pardeshi
शहापूर (प्रतिनिधी) भाजपा ओबीसी जागर अभियानाच्या रथयात्रेची सुरुवात ठाणे ग्रामीण मधून सुरू, खा कपिलज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
काल रविवारी रथयात्रा शहापूर शहर मध्ये दाखल, शहापूर शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून सुरुवात केली शहरातील संत तुकाराम महाराज चौक,अंबिका माता मंदिर,कस्तुरी कॉम्प्लेक्स , तावडेनगर , गोनेंनगर,तसेच शहरातील विविध ठिकाणी जाऊन जागर अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस करणताई, रविंद्र चंदे साहेब जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण,श्री. राजेशकुमार शिर्के साहेब जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी युवा मोर्चा ठाणे ग्रामीण,श्री.संजय बोर्लीकर साहेब अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा शहापूर शहर,श्री.योगेश विशे अध्यक्ष भाजपा ओबीसी युवा मोर्चा शहापूर शहर,श्री हिराजी हरड अध्यक्ष भाजपा ओबीसी युवा मोर्चा शहापूर शहर, श्रीमती.भूमिका शिर्के अध्यक्ष भाजपा ओबीसी युवा महिला मोर्चा शहापूर शहर, श्री.अशोक वेखंडे, श्री. गणेश हरड,श्री. निशांत हरड, श्री. वैभव खाडे,श्री.विश्वास देसले,मुरबाड तालुका अध्यक्ष ओबीसी युवा मोर्चा श्री.संदीप कोर, श्री.मुकेश निमसे,श्री. बंगाल साहेब ,श्रीमती. आशा गोतरने मॅडम,श्री. भास्कर भांगरे चिटणीस भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण, कु. ओमकार वरकुटे,श्री. प्रमोदजी शिर्के उपाध्यक्ष भाजपा ओबीसी युवा मोर्चा शहापूर तालुका,श्री.संजय बोंडे,श्री हेमंत वेखंडे,श्री. अशोक गोतरने,भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





