आपल खान्देश
लोहारा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची मनमानी…!
बँकेचे रोख रक्कम व्यवहारासाठी मर्यादा नियम..
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथिल एकमेव बँक सेंट्रल बँकेने ग्राहकांना आर्थिक रोख रक्कम व्यवहारात 20 हजाराची मर्यादा लादल्याने ग्राहकांची होत आहे गैरसोय होत आहे गेल्या काही महिन्यापासून वीस हजार रुपयापर्यंतचे पैसे भरणे किंवा काढणे सेंट्रल बँकेत बँकेने बंद केल्यामुळे, लोहारा येथिल बँकेचे खातेदार यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने ग्राहक राजा हवालदिल झाला आहे.
लोहारा येथील बँक सेंट्रल बँकेच्या आर्थिक रोख रक्कम व्यवहारात 20 हजाराची मर्यादा लादल्याने ग्राहकां चांगलाच मेटकुटीस आला असून या मर्यादा शिथिल करण्याची मागणी ग्राहक करत आहेत तसा अर्ज देखील देण्यात आला असून, लोहारा गावात आर्थिक देवाण घेवाण साठी बँक हाच पर्याय असून त्यातही 20 हजाराची मर्यादेचा नियम लादल्याने सुमारे 10 हजार ग्राहकांची गैरसोय होत असल्याची तक्रार अर्ज करण्यात आला आहे.


