ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी..

मुंब्रा येथे एका मराठी (Marathi) तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

ठाणे : महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत. विशेषत: राजधानी मुंबईतच (Mumbai) या गोष्टीचा प्रत्यय येतो. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका शुक्लानामक अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला गुंडांकरवी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं, तर विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांनी (Police) अटक करुन चौकशीही केली. आता, पुन्हा एकदा मराठी व अमराठी असा वाद समोर आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका मराठी (Marathi) तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून संबंधित युवक दोन्ही कानांना हात धरुन जमावाची माफी मागत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. तसेच, मी केवळ फळविक्रेत्याला मराठीत बोल असा आग्रह केल्याचंही तो वारंवार सांगताना दिसून येतोफळविक्रेताला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी ⁠मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ⁠या मराठी युवकास मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली आहे. मुंब्रा येथे मराठी-हिंदी वाद झाल्याचे दिसून येते. ⁠एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना हा वाद झाल्याची माहिती आहे. ⁠फळविक्रेत्याकडून फळे घेत असताना मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र, फळविक्रेत्याने मराठी येत नसल्याचे सांगत्यावरुन दोघांमध्ये हा वाद झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे