“जनसेवकाच्या सेवेला जनता मिळाली साथ – दक्षिणेश्वर हनुमंतरायाच्या महाआरतीतून नगरसेवक संकल्प..
पाचोरा नगरपालिका निवडणूक वेध लागले असून पाचोरा शहरातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक निस्वार्थ जनसेवक – बंडूभाऊ केशव सोनार – यांच्यासाठी एक वेगळाच भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवास मिळाला.
पाचोरा शहरातील नवजीवन विद्यालयाजवळ, तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुलच्या मागे वसलेले इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिर – हे पाचोरा शहरातील श्रद्धेचे केंद्र. असं मानलं जातं की येथे केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार येथे श्रद्धेची मोठी गर्दी असते. आणि याच पवित्र ठिकाणी, जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने, एक संकल्प महाआरती पार पडली – जनसेवक बंडूभाऊ सोनार यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकीट मिळावं, आणि प्रचंड मतांनी ते विजयी व्हावेत, हा संकल्प नागरिकांनी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण केला.
मारुती रायाची आरती बंडूभाऊ सोनार यांच्या हस्ते संपन्न झाली. विशेष म्हणजे बंडूभाऊ यांच्याकडे कोणतेही पद नाही, कोणतीही राजकीय लालसा नाही – तरी देखील, ते आजवर निःस्वार्थपणे अहोरात्र लोकसेवेत गुंतले आहेत. रुग्णसेवा, गरजूंची मदत, नागरी समस्या असोत किंवा सामाजिक कार्य – कुठेही ते मागे राहत नाहीत.
यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. जय श्रीराम, जय हनुमान! च्या गजरात वातावरण भारलेलं होतं. या संकल्प आरतीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते गोपाल बन्सी लोहार, प्रशांत पाटील, अशिष लोहाटी, भाऊळ चौधरी, बापू चौधरी, शुभम शिंदे, उदय महाराज, लकी कळमकर, राज सोमवंशी आणि हनुमानाचे सर्व भक्तगण.
या आरतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पद नसतानाही जो जनतेसाठी झटतो, तोच खरा जनसेवक असतो. आणि असा जनसेवक जर पदावर आला, तर जनता कशी त्याच्या मागे उभी राहते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.हा केवळ राजकीय संकल्प नाही, ही एक श्रद्धा आहे. हनुमंतरायाच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने बंडूभाऊ सोनार यांचा मार्ग यशस्वी होवो, हीच प्रार्थना करत उपस्थित भक्तांनी अपेक्षा व्यक्त केली.



