आपल खान्देश

धक्कादायक – धुळे तालुक्यात नऊ महिन्याच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या!

झूम मराठी

धुळे (झूम मराठी वृत्तसेवा) तालुक्यातील वणी येथे माळी कुटुंबियांकडे गोंधळाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असताना २३ वर्षीय सून सोनमने ९ महिन्यांची चिमुकली हर्षदाला गळफास दिला. त्यानंतर स्वत: झोळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १२ मार्चला दुपारी चारच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वणी गावातील सुधाकर माळी हा तरुण शेती व मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. माळी कुटुंबीयांकडे काल (दि. १३) जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यासाठी लगबग सुरू होती. सुधाकर माळी हे त्याची पत्रिका देण्यासाठी चौगाव- गोताणे येथे गेले होते, तर त्यांचे आई-वडील हे शेतात होते. या वेळी सुधाकर माळी यांच्या पत्नी सोनम व चिमुकली हर्षदा घरी होती. घरी कोणीही नसल्यामुळे सोनमने सुरुवातीला हर्षदाला गळफास दिला. त्यानंतर झोळीच्या दोरीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पाेलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते व पथक दाखल झाले. तोपर्यंत दोघांना खाली उतरवण्यात आले होते. त्यानंतर सोनम व हर्षदा यांना हिरे रुग्णालयात नेल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. काल शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर दुपारी पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी झाला.

सोनम व सुधाकर यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. सोनम यांचे माहेर शिंदखेडा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम व सुधाकर वरच्या मजल्यावर विभक्त राहत होते, तर खालच्या मजल्यावर सुधाकर यांचे आई वडील होते. सोनम अन्‌ सुधाकर यांचा घरातील ज्‍येष्ठांशी अबोला नव्हता. जागरणाच्या कार्यक्रमासाठी सोनमही उत्साही होती. मग तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे