स्वकर्तृत्वावर गगन भरारी घेतलेले गृहनिर्माण युवाउद्योजक अपूर्व थेपडे..
अल्पावधीतच बांधकाम व्यवसायात यशस्वी ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजेच पाचोरानगरीचे सुपुत्र अपूर्व थेपडे यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा...
वाढदिवस विशेषांक..
काही माणसं जन्मतःच वलयांकित, प्रतिभावान असतात, आपल्या सहकार्य प्रवृत्ती व संघटन कौशल्य यांच्या पाठबळावर व माणुसकीच्या व व्यावसायिक पातळीवर अल्पावधीतच बांधकाम व्यवसायात यशस्वी ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजेच पाचोरानगरीचे सुपुत्र अपूर्व थेपडे यांचा आज 22 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमीत्ताने त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा…
गृहनिर्माण उद्योजक अपूर्व थेपडे आपल्या व्यवसायात यशस्वी भरारी घेत असताना मर्यादीत न राहता समाजाशी असणारी नाळ त्यांनी कधीही तुटु दिलेली नाही. पाचोरा शहरात, तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबाला परवडतील अश्या घरांची निर्मिती थेपडे बिल्डरच्या वतीने करण्यात येते, तरुण वयात प्रसिद्ध यशस्वी उद्योजक म्हणुन त्यांच्याकडे बघितले जाते.
सर्वसामान्य लोकांना स्वस्त, वाजवीदरात तेही दर्जेदार घरे मिळावे यासाठी उद्योजक अपूर्व थेपडे नेहमी प्रयत्नशील असतात.
पाचोरा तालुक्यात सर्वात मोठ मोठी घरकुल बांधनारे उद्योजक अपूर्व थेपडे यांच्याकडे बघितले जाते. आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने सातत्याने ज्या ज्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात योगदान देता येईल अशा ठिकाणी आपलं यथाशक्ती योगदान देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरीही विविध सामाजिक उपक्रमांना उपस्थित राहुन होतकरू युवकांना आपुलकीने जवळ घेऊन ते मार्गदर्शन करताना दिसतात. उन्हाळ्यात भडगाव रस्त्यावर तहानलेल्यानां स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली जाते.
या पाठीमागे सामान्य कुटुंबातील युवक घडला पाहिजे तो पुढे गेला पाहिजे हिच तळमळ त्यांची असते. मी गेली अनेक वर्षे पाहतोय उद्योजक अपूर्व थेपडे सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत करत जातीने त्या ठिकाणी उपस्थित असतात. व इतरही अनेक अशा कार्यक्रमांना सातत्याने हजेरी लावतात. सर्वसामान्य लोकांना स्वस्त, वाजवीदरात तेही दर्जेदार घरे मिळावे यासाठी उद्योजक अपूर्व थेपडे नेहमी प्रयत्नशील असतात.
आजपर्यंत जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. त्यातुनच आपल्या कामाच्या जोरावर एक वेगळा चाहता वर्गही निर्माण केला आहे. पारदर्शक व प्रामाणिक कामाला आजवर त्यांनी प्राधान्य दिले हेच त्यांच्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज त्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..
शब्दांकन – पत्रकार दिलीप जय परदेशी
#9022764411




