आपल खान्देश

पाचोऱ्यात खर्चाला फाटा देत वारकरी भवनातील विद्यार्थ्यांना अन्नदान देत, शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा..

  • पाचोरा – झूम मराठी ऑनलाईन

आजच्या या युगात नेत्याच्या वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. मात्र पाचोऱ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यानीं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत वारकरी भवन शिक्षण संस्थेतील अनाथ विद्यार्थ्यांसाठी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि केंद्रातही कृषीसह विविध खात्यांचा पदभार सांभाळण्याचा अनुभव असलेले शरद पवार 84व्या वाढदिवसाच्या निमित्त अवाढव्य खर्चाला फाटा देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्तेनीं पाचोऱ्यातील जारगाव वारकरी  शिक्षण संस्थेतील अनाथ विद्यार्थ्यांसाठीसाठी अन्नदान करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

वारकरी  शिक्षण संस्थेचे भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर यांनी यासर्वांचे आभार मानले आणी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, अझर खान, उमेश एरंडे, सुदाम वाघ, अँड अविनाश सुतार, वाजीद बागवान, संदीप महालपुरे, प्रशांत महाले, गणेश पाटील, नरेंद्र पाटील (पिंटू), हरीश पाटील, लिलीधर पाटील, भाऊसाहेब अशोक मोरे हे उपस्थिती होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे