आपल खान्देश
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत, पाचोरा नगपरिषदेतर्फे वृक्ष लागवड
9 ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त व विश्व आदीवासी दिवसा निमीत्त व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पाचोरा नगपरिषदेतर्फे वृक्ष लागवाड
पाचोरा:- येथील पाचोरा नगरपरिषदेर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिवस व आदीवासी दिवस पाचोरा हुतात्मा स्मारक येथे माझी वसुंधरा अभियानाअंगतर्गत वृक्ष लागवड करुन साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी 9:30 वाजता स्वातंत्र्य सैनिकांचे भाऊ मगन मिस्तरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, प्रशासकिय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले, उपमुख्याधिकारी दगडु शिवाजी मराठे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अभियंता मधुकर सुर्यवंशी, रोखपाल सुधिर पाटील, सहा.ग्रंथपाल शाम ढवळे, राजेंद्र शिंपी, ललित सोनार, किशोर मराठे, सुनिल धनगर,विलास कुंभार गजानन पाटील तसेच नगरपरिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी, सामाजीक कार्यकर्ते सुधाकर वाघ व समाजबांधव आदि मोठया संख्येने उपस्थित होते.






