आपल खान्देश

राष्ट्रीय जनमंच पक्ष चाळीसगाव तालुकासह चाळीसगाव शहर कार्यकारिणी जाहीर

चाळीसगाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी पक्ष संघटन मजबूत करणे तथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचा सूचना महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप दादा लांडगे यांनी दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा राष्ट्रीय जनमंच पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख देविदास वाघ यांनी केली. 

यात चाळीसगाव, भडगाव पाचोरा, जळगाव ग्रामीण, एरंडोल पारोळा, जामनेर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास हटकर यांनी राष्ट्रीय जन मंच पक्षाची ताकद उत्तर महाराष्ट्र मध्ये वाढली आहे आणि तिसरा पर्याय देणार असलायचे सांगितले.

राष्ट्रीय जनमंच पक्ष च्या कार्यालयात झालेला आढावा बैठकीत चाळीसगाव तालुका आणि चाळीसगाव शहर कार्यकारिणी जाहीर झाली खालील पदे निवड करण्यात आली असून चाळीसगाव शहर अध्यक्ष पदी राकेश देशमुख, शहर संघटक – सुनील निंबाळकर,शहर सचिव- प्रकाश पंढरी नाथ म्हस्के,शहर सचिव- प्रकाश पंढरी नाथ म्हस्के, शहर कोषाध्यक्ष – संदीप रणधीर,वाहतुक आघाडी शहर अध्यक्ष – प्रशांत असबे, युवक आघाडी शहराध्यक्ष-दीपक सोनवणे, युवक आघाडी उप शहराध्यक्ष-सागर जाधव, युवक आघाडी शहर सचिव- दुर्गेश पवार,

चाळीसगाव तालुका कार्यकारिणीत वाहतूक आघाडी चाळीसगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष- आदिनाथ पाटील, सुनील सतुके तालुका कोषाध्यक्ष, रुपेश साबळे- तालुका उपाध्यक्ष, रतन रावते – तालुका संघटक चाळीसगाव, दादाभाऊ धोंडीबा जाधव- तालुका अध्यक्ष शेतकरी आघाडी, तालुका चिटणीस-  गुणवंत चव्हाण.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे