महाराष्ट्रराजकीय

विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यु,

एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिलेत..


.मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला . या अपघातात मेटे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे दुःख व्यक्त केले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ,

साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे