पाचोऱ्यात साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज पुण्यस्मरण दिनी केले अभिवादन
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिननिमित्त पाचोऱ्यातील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित शाळेच्यावतीने नवकार मंत्राचे उच्चारण करून अभिवादन करण्यात आले.
जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिननिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला या वेळी नवकार मंत्राचे उच्चारण करून अभिवादन या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुळकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला खजिनदार जगदीश खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, शाळा कमिटी सचिव रितेश ललवाणी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, सी.ई.ओ. अतुल चित्ते, पर्यवेक्षक वाल्मीक शिंदे, किरण बोरसे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



