आपल खान्देश

बंजारा क्रांती दलाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी अरुण पवार

झूम मराठी

पाचोरा (प्रतिनिधी) समाज कार्याची आवड बघता तालुक्यातील अंबे वडगाव येथील अरुणसिंग बाबुसिंग इसाळावत उर्फ अरुण पवार यांची बंजारा क्रांती दलाच्या प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

सदरची नियुक्ती बंजारा क्रांती दल (महाराष्ट्र प्रदेश) चे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी केली आहे. बंजारा क्रांती दलाचे कार्य प्रदेश, विभाग, जिल्ह्यात अधिक प्रभावी व जोमाने वाढविण्याची जबाबदारी अरुण पवार यांना देण्यात आली आहे. अरुण पवार हे तालुक्यात परिचीत असुन त्यांच्या जनसंपर्काचा निश्चितच बंजारा क्रांती दलास फायदा होणार आहे. अरुण पवार यांनी तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रात गाव तेथे बंजारा क्रांती दल स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. अरुण पवार यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे