मनसेत पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांनी केला पक्ष प्रवेश…
- दिलीप जय परदेशी
भडगाव (झूम मराठी ऑनलाईन) विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असतांना प्रत्येक राजकीय पक्ष वाढीसाठी व तयारीला लागले आहेत, जळगाव जिल्ह्यात मनसे वाढीसाठी सरसावली असून आज जळगाव जिल्ह्याध्यक्ष अनिल वाघ यांच्या उपस्थितीत मोठया प्रमाणात भडगाव तालुक्यातील जोरदार पक्षप्रवेश झाला असून यांचा फायदा मनसेला येणाऱ्या निवडणुकीत होईल.
भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये पाचोरा भडगाव मतदार संघातील कनाशी देव्हारी आढळसे घुसर्डी तांदूळवाडी नगरदेवळा शिंदाड येथील शेकडो युवकांनी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला असून त्यातील हर्षल पाटील, व मयुर पाटील यांची भडगाव तालुका उपध्यक्ष पदी निवड करण्यात आली, असून यावेळी जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, मनसे विध्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदूले, भडगाव तालुकाध्यक्ष सागर पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, पाचोरा तालुकाध्यक्ष तुषार बोरसे, शहराध्यक्ष ऋशिकेश भोई, विभाग अध्यक्ष पाचोरा वाल्मीक जगताप, राजेंद्र पाटील महाराष्ट्र रेल्वे कामगार सेना अध्यक्ष, प्रशांत आहिरे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष, ओमराव सुर्यवंशी, अक्षय चव्हाण, अमोल कांबळे, शरद पवार, मयुरेश ढाडीवाल, दिनेश पाटील, सहीद पठाण इलियास, रवी पवार यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



