पाचोरा डी एम वॉटर पार्क ९ फेब्रुवारी पासून सेवेत..
जळगाव | झूम मराठी ऑनलाईन |
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीपासून हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती, या प्रकल्पाचे संस्थापक दीपक मांडगे आणि दादासाहेब मांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डी एम वॉटर पार्कमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वॉटर स्पोर्ट, रेन डान्स, वॉटर गेम यासह थ्रीडी थिएटर, डॅशिंग कार ,चाइल्ड स्लाइड, वॉटरफॉल व्हेवपूल, लाईव्ह डीजे आदींचा यामध्ये समावेश आहे. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा शिवारात सुगरण गृहउद्योग जवळ चार एकर जागेवर हा भव्य प्रकल्प साकारण्यात आला आहे. पाचोरा तालुकाच नव्हे जळगाव जिल्ह्याच्या वैभवात या प्रकल्पामुळे भर पडणार आहे. या प्रकल्पामध्ये लहान मुलांसाठी विविध राइड्स तसेच मोठ्यासाठीही थरारक राइडस उपलब्ध आहेत. यासोबत अमुझमेंट पार्कची मजादेखील अनुभवयास मिळणार आहे. याशिवाय या सर्वांसोबत सुसज्ज कॅन्टीन आणि पुरुष महिलांना वेगवेगळ्या चेंजीग रूम देखील उभारण्यात आले आहे. जळगाव जिल्हातील नागरिकांना मनोरंजनाची सफर घडविणारा हा पार्क आहे.



