आपल खान्देशमहाराष्ट्र

राष्ट्रीय जन मंच पक्षाच्या वतीने चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी संदीप लांडगे यांना जाहीर..

चाळीसगाव (झूम मराठी) राष्ट्रीय जन मंच पक्षाच्या वतीने चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी संदीप लांडगे यांना जाहीर झाल्याने संदीप दादा लांडगे हे कामाला लागले असून चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील संपर्क दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. या मतदारसंघात त्यांना आमदार मंगेश चव्हाण, व उन्मेष पाटील यांचे आव्हान असणार आहे.

राष्ट्रीय जन मंच पक्षाचा जळगाव जिल्हा संपर्क दौरा सुरू आहे चाळीसगाव तालुक्यातील संपर्क दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय जन मंच पक्षाचे अध्यक्ष मा. प्रा. राधाकृष्ण बाचकर, पक्षाचे कार्याध्यक्ष कैलास कोळसे पाटील, यांनी सर्वानुमते राष्ट्रीय जनमंचे पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप दादा लांडगे यांची घोषणा केली.

राष्ट्रीय जन मंच पक्षाच्या चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील संपर्क दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील १० गावांना भेटी दिल्या. मेहूनबारे, भोरस, दहिवद , कलमडू, आभोने, राजमाने, इत्यादी गावांना भेटी दिल्या.

यावेळी राष्ट्रीय जन मंच पक्षाचे अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर सर म्हणाले की, युवकांच्या हाताला काम नसून ते बेरोजगार झाले आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला कोणत्याच प्रकारचा न्याय मिळत नसून, त्यांची ग्रामपंचायत प्रशासानापासून तहसील, पं. स. प्रशासनापर्यंत त्यांची पिळवणूक होत आहे.

पक्षाचे कार्य अध्यक्ष इंजी. कैलास कोळसे पाटील यांनी तालुक्यात विविध विकास कामे झाली असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात मात्र ती कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झालेले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरा बसेल असे काम आपल्याला करावे लागेल.  या संवाद दौऱ्या- दरम्यान सर्व समाज घटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटक देविदास वाघ , जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, राष्ट्रीय जनमंचे पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप दादा लांडगे, अशोक दादा शेटे, जालिंधर पठाडे, प्रकाश म्हस्के, गजानन चांदनशिव, दिनेश रणधीर, राष्ट्रीय जन मंच पक्षाचे तालुका आणि शहर प्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे