आपल खान्देशसखी
पाचोऱ्यात आज जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन..
पाचोरा (झूम मराठी) संविधान शाहिरी जलसा संविधान रक्षणाच्या चळवळीसाठी विद्रोही गाण्यांचे वादळ तसेच जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पाचोरा भडगाव तालुका व परिसरातील नागरिकांनी आणि प्रवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.
आपल्या पाचोरा शहारात दि. 15 ऑक्टोबर 2024 मंगळवार, वेळ:- सायंकाळी 6:00 वा. स्थळ:- माताश्री कैलादेवी मंदिरा शेजारील सावा मैदान,भडगाव रोड, याठिकाणी ज्याची ओळख शिव – फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील हल्लाबोल गाण्यांचे वादळ व जो थेट ऑस्करला धडकलेला आहे, त्या जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत व त्यांच्या सहकार्यांचा विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन ही करण्यात आले आहे.



