ब्रेकिंग

टिक टॉक स्टार संतोष मुंडेचा दुर्दैवी मृत्यू…

टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह बाबुराव मुंडे या दोन युवकांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोगलवाडी येथे आज (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे याने टिक टॉकच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोवर असून त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. घटनेची नोंद धारुर पोलिसांत केली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे