ब्रेकिंग

महिलांच्या कार्यक्रमातील गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही,अन्यथा समजेल त्या भाषेत उत्तर देऊ- अमोल शिंदे

भाजपाच्या दांडिया उत्सवात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला धुडघुस...


भडगांव येथील पारोळा रोड वरील भवानी बाग मैदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व अमोलभाऊ शिंदे मित्र परिवाराच्या वतीने ‘अनमोल दांडिया’ रास उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत असलेल्या या दांडिया उत्सवाला काल बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष योगेश गंजे या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत भर कार्यक्रमात हातात दांडा घेऊन आत मध्ये प्रवेश करत लाईट,साऊंड व इत्यादी वस्तूंची तोडफोड केली. तसेच उपस्थित मान्यवरांना व प्रेक्षक आणि स्पर्धक महिलांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना काल रात्री घडली आहे. परंतु तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी यावेळी कुठल्याही प्रकारे सदर इसमास मज्जाव केला नाही. व अटक देखील केली नाही.

  त्यानंतर या गुंड प्रवृत्तीच्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्या विरोधात अमोल शिंदे यांच्यासह भडगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा भडगाव पोलीस स्टेशन येथे एकत्र जमून भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. व सदर गुंड प्रवृत्तीच्या इसमास तात्काळ अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भडगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. 

 शांत, व सू-संस्कृत वारसा असणाऱ्या भडगाव शहराला गालबोट लावणारी ही घटना अत्यंत खेद जनक असून सदर गुंड प्रवृत्तीच्या शिंदे गटाच्या शहराध्यक्षाला स्थानिक आमदार किशोर पाटील हे पाठीशी घालत असल्यानेच संबंधित पदाधिकारी हा अशा प्रकारे कृत्य करू शकतो. असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच भडगाव शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित दांडिया रास स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या माता-भगिनींच्या कार्यक्रमात घुसून अशा प्रकारे तोडफोड करणे व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणे या गुंडगिरीचे भडगावकर माता-भगिनी व बांधव कधीच समर्थन करणार नाही व विसरणार देखील नाहीत.

या गुंडगिरीला आता कायमचा आळा घालण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनताच योग्य तो उपचार करेल. या घटनेचा भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करत असून सदर गुंडांना तात्काळ अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करीत आहोत. असे भाजपा पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले याप्रसंगी भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष, धर्मेंद्र(मुन्ना) परदेशी, नरेंद्र पाटील, भाजपा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष देविदास पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी, भाजपा युवा मोर्चा विधानसभा संयोजक किरण शिंपी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस विकास महाजन, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, विश्वनाथ भोई, भूषण देवरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे