पाचोरा इलेक्ट्रिशियन असोसिएशनचे झाले भव्य उदघाट्न
पाचोरा नगरीत, इलेक्ट्रिशियन बांधवानी एकत्र येऊन, पाचोरा इलेक्ट्रिशियन असोसिएशन या नावाने समस्त इलेक्ट्रिशियन बांधवांसाठी कार्य करणारी, व सामाजिक कार्य करण्याकरिता या संस्थेचे 29 सप्टेंबर 2024, रविवार रोजी पाचोरा इलेक्ट्रिशियन असोसिएशन च्या वतीने श्री. प्रसाद हॉल, भडगाव रोड येथे उदघाट्नाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या वेळी पाचोरा इलेक्ट्रिशियन असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने इलेक्ट्रिशियन बांधव उपस्थित होते. 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पदाधिकारी आणि पत्रकारांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले असून, ही संस्था इलेक्ट्रिशियन बांधवांसाठी कार्य कश्या पद्धतीने करेल वा त्यांना कसा फायदा घेता येईल विमा आणि आर्थिक साहाय्य या विषयावर चर्चा करण्यात आली.. यात संस्थे चे शाखा अध्यक्ष – श्री. अतुल जोशी, उपाध्यक्ष – श्री. विश्वनाथ आदिवाल, सचिव – श्री. भूषण कुलकर्णी, प्रमुख सल्लागार – सलीम दादा शेख, कार्यकारणी सदस्य – श्री.मनोहर सोनार, कार्यालय प्रमुख – श्री.नितीन सोनवणे, प्रवक्ता – श्री.मिलिंद गायकवाड, संपर्क प्रमुख – रईस दादा शेख, सह सचिव – श्री.मुकुंदा पाटील ( मुकेश भाऊ ), प्रसिद्धी प्रमुख – श्री.नरेंद्र मिस्तरी, विभाग प्रमुख – प्रदीप पाटील, कोषाध्यक्ष आणि सभासद हे उपस्थित होते.



