ब्रेकिंग

पाचोऱ्यात १० वर्षीय चिमुकला ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू..!

पाचोऱ्यातील भडगाव रोड लगतच्या शक्तीधाम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. १० वर्षीय चिमुकला शाळेतून आल्यावर सायकलचालवत खेळण्यात गेला आणि त्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाचोरा शहरातील शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिकत असलेला १० वर्षीय चिमुकला रुद्र हा पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत आपल्या आई वडिलांसोबत राहणारा रुद्र जितेंद्र गोसावी आज शाळेतून आल्यावर सायकल चालवत शक्तीधाम परिसरात खेळण्यासाठी गेला असता भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरखाली आल्याने होत्याचे नव्हतं झाले! चिमुकला रुद्राचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रुद्रचे पालक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी हंबरडा फोडला. घटनास्थळाहून रुद्रचा मृतदेह मुकेश पाटील (पुनगाव) यांनी रुग्णवाहिकेतून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनी परिसरासह शहरात शोककळा पसरली आहे. सदर संशयित ट्रॅक्टरचालक विरोधात गुन्हा दाखल झाला असून पाचोरा पोलीस तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे