आपल खान्देश

पाचोऱ्यात इलेक्ट्रिशियन असोशियनच्या माध्यमातून पाचोऱ्यात इलेक्ट्रिशियन बांधवांची शाखेचे उदघाटन

पाचोरा तालुक्यातील इलेक्ट्रिशन बांधव एकत्रित येऊन झाले संघटित..

  • दिलीप जय परदेशी

इलेक्ट्रिशियन कारागीरांच्या न्याय हक्कासाठी  पाचोऱ्यात स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवभावी बहुउद्देशीय संस्था संचलित  इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन असोशियन पाचोरा तालुक्यातील शाखेचा शुभारंभ अध्यक्ष कल्पेश सोमाणी यांच्या हस्ते आज मोठया उत्साहात सपन्न झाला.

जळगाव जिल्ह्यात इलेक्ट्रिशियन कारागीरांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या आर्थिक पाठबळेत लाभ कसा होईल, दुर्घटना झालीतर आपले कुटंब विमा संरक्षीत झाले पाहिजे यासाठी योजना काढा असा सल्ला देण्यात आला, सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे मुख्य उद्देश असून, प्रत्येक कारागीराने दर महा काही पैसे जमा केले तर शेवटी प्रत्येक इलेक्ट्रिशियनला मोठी रक्कम हातात मिळेल अशी योजना आमलात या संस्थे मार्फत करण्यात येईल असे आवाहन अध्यक्ष कल्पेश सोमाणी यांनी जमलेल्या इलेक्ट्रिशियन बांधवाना करण्यात आले.

यावेळी जळगाव स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवभावी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष कल्पेश बद्रीनाथ सोमाणी, उपाध्यक्ष प्रदीप नाना पाटील, सचिव कल्पेश प्रविण खैरनार, सदस्य – इसरार निसार खान, जहांगीर इब्राहीम शाह, विनायक विष्णु अंतरदे, रविंद्र नारायण आगळे, राम रत्नाकर जेऊरकर, रोशन हुसेन मनियार,  रविंद्र प्रताप पाटील ह्यांच्या उपस्थितीत पाचोरा शाखेच्या उदघाटन करण्यात आले.

पाचोरा कार्यकारणीचे अध्यक्ष अतुल जोशी (नदू भाऊ), उपाध्यक्ष  विश्वनाथ आदिवाल, सचिव भूषण कुलकर्णी, कोषाध्यक्ष हिम्मत पवार, विभाग प्रमुख प्रदीप पाटील, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र मिस्तरी, संपर्क प्रमुख रईस शेख, प्रवक्ता सल्लागार सलीम शेख, कार्यकारणी सदस्य मनोहर सोनार, कार्यालय प्रमुख नितीन सोनवणे,  सहसचिव मुकुंदा पाटील, प्रवक्ता मिलिंद गायकवाड, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे