आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळ्यात शेतकऱ्याचा मेळावा भाजपच्या डॉ नीलकंठ पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न…

मला एकदा विधानसभेत जाण्याची संधी द्या तुमच्या विहिरीला बारामहीने पाणी आणेल..

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे डॉ नीलकंठ पाटील यांच्या वतीने परिसरातील शेतकरी बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास शेतकरी मेळाव्यास चांगला प्रतिसाद लाभला असून हा शेतकऱ्यांना मेळावा लाभकारक ठरणार.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतिष अण्णा पाटील, तसेच  विकास लोहार यांनी मार्गदर्शन केले शेतकरी बांधवाना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले तसेच विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी प्रयत्न करावे, विषारी अन्न खाल्याने मानवी जिवणावर होणारे दुषपरीणामाची माहिती दिली व शेतकरी बंधुनी आपल्या कुटुंबाकरीता विषमुक्त भाजीपाला व कडधान्य आपल्या शेतात पिकवावे असे आवाहन केले. 

शेतकरी मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शन भाजपचे डॉ.नीलकंठ नरहर पाटील म्हणाले, बारमाही नद्या जिवंत करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करेल. मला आमदार म्हणून निवडून आणल्यावर तापी नदीचे पाणी वॉटर लिफ्टिंगने पाणी नद्यांना पाणी आणेल व प्रत्येक विहीर बारमाही  जिवंत करेल. यामुळे शेतकरी राजा बाराही महिना उत्पन्न घेतील. मी हॉस्पिटल डॉक्टरकी, सांभाळुन शेती करतो त्यामुळे शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्या अडचणी मी सोडवण्यासाठी तत्पर आहे. आपण सर्वानी मला एकवेळा आमदार बनण्याची संधी द्यावी. असेही ते म्हणाले. 

व्यासपीठावर मान्यवरांचे सत्कार करण्यात आला, त्यामध्ये श्री गणपत शंकर कोष्ठो गुरुजी, श्री सर्जेराव माधवराव पाटील, श्री परशुराम भडांगे, धनगर वाडी, श्री भास्कर कोष्ठी, नगरदेवळा शेंद्रीय शेती करता, श्री संजय घुडकू भोई बाळद बु, श्री डॉ एम.बी. परदेशी आखतवाडे, श्री सचिन महाजन युवा शेतकरी नगरदेवळा, श्री विकास पवार कृषी गट खाजोळा, श्री फुलसिंग डोंगर गढरी, श्री भगवान वामन संसारे, श्री जगदीश नाना पाटील, वाडी शेवाळे, श्री अरुन दगड्ड अहिरे बदरखे तांडा श्री ज्ञानेश्वर हरी पाटील, श्री सचिन पाटील नेरी, श्री अजबराव पाटील सार्वे, श्री कमलेश पाटील सार्वे श्री उत्तम शंकर पाटील सार्वे. अशोक हरीचंद्र पाटील श्री धर्मराज पाटील बात्सर उप संरपंच श्री कैलास शिवदास सोमवंशी बाळद बु, श्री मोतिलाल पाटील घुसर्डी ता पाचोरा, मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांना बळीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वी संपन्न करण्यासाठी वृंदावन फाउंडेशन चे कार्यकत्यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे