भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! आता ट्रेन भाड्याने घेता येणार!
भारतील रेल्वे नागरिकांच्या सोईसाठी नवनवीन सुविधा, योजना घेऊन येत आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीकरिता अनेक विषेश ट्रेन सुरु केल्या आहेत. तर आता भारतीय रेल्वेने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवाशांना आता एक खास ऑफर दिली आहे. ज्या अंतर्गत कोणतंही राज्य सरकार किंवा कंपनी किंवा व्यक्ती ट्रेन भाड्यानं घेऊ शकते.
भारतीय रेल्वेने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत कोणतीही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने घेऊ शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली आहे. या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे. या योजनेंतर्गत, 3333 कोच म्हणजेच 190 गाड्या रेल्वेने राखीव ठेवल्या आहेत. या गाड्यांना ‘भारत गौरव ट्रेन’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत ट्रेन भाड्यानं घेण्यासाठी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्याबदल्यात रेल्वे किमान भाडं वसूल करेल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सुमारे 190 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास या गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल, असेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान या विशेष गाड्या पर्यटन स्थळांसाठी चालविल्या जाणार आहेत. भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. तर येत्या काळात रेल्वे गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालविणार असल्याचेही रेल्वे मंत्री म्हणाले.


