महाराष्ट्र

‘धनगर समाज संघर्ष समिती’ ठाणे शहरातील पदाधिकारी यांची नियुक्ती

पद्मश्री खासदार डॉ. विकासजी महात्मे साहेबांच्या हस्ते ठाणे शहरातील पदाधिकारी यांची नियुक्ती करताना सोबत पदाधिकारी 

ठाणे (प्रतिनिधी) धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढाणारी संघटना म्हणजे ‘धनगर समाज संघर्ष समिती’ पद्मश्री खासदार डॉ. विकासजी महात्मे साहेबांच्या हस्ते ठाणे शहरातील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढाणारी संघटना म्हणजे ‘धनगर समाज संघर्ष समिती’ राज्यात जोमाने काम करताना दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात धनगर समाज संघर्ष समितीचे कार्यकर्ते सामाजिक काम करतात व समाजातील अन्यायाला वाचा फोडत असतात.

खासदार साहेबांनी धनगर समाज संघर्ष समिती महा. राज्य यांच्या माध्यमातून ठाणे शहरात श्री. संतोष तुकाराम पांढरे यांना ठाणे शहर उपाध्यक्ष हे पद देण्यात आले व श्री. मारुती बाबु गाडीकर यांना संघटनेचे ठाणे शहर सरचिटणीस हे पद देण्यात आले या प्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर परदेशी सर,ठाणे शहर अध्यक्ष श्री.अजय खंडू हाक्के,नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष संदिप पांढरे,अम्बरनाथ तालुका अध्यक्ष श्री. गणेश गढरी,सुनिल परदेशी,स्वप्नील परदेशी,उमेश परदेशी व इतर धनगर समाज बांधव उपस्थित होते नव निर्वाचित पदाधिकारी यांना खासदार डॉ विकासजी महात्मे यांनी खूप शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीत जोमाने काम करण्यासाठी सर्व समाज बांधावाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे