ब्रेकिंग

गुलाब चक्रीवादळ : विदर्भ – मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून ‘या’ 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई :- बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रात आज  धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे.

बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री ( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पासून सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

हवामान विभागाकडून या 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

आजपासून 27 सप्टेंबर  पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हे गुलाब चक्रीवादळ जवळपास 95 किमी प्रतितास वेगाने  किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील  जारी करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे