आपल खान्देश

बोरखेडा येथे सासऱ्याने केले सरकारी जागेवर अतिक्रमण, सरपंच पदावरुन सून पायउतार..

बोरखेडा येथे सासऱ्याने केले सरकारी जागेवर घराचे बांधकाम, शासकीय जमिनिवरिल अतिक्रमण केल्याचे प्रकरण भोवले, सुन सरपंच पदावरुन पायउतार..


झूम मराठी

चाळीसगाव (झूम,प्रतिनिधि) चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु।। येथील ग्राम पंचायतीचे सरकारी जागेवर सासऱ्याने राहते घराचे बांधकाम केल्यामुळे सरपंच सपना गुलाब पाटील याना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून ग्रामस्थ देवीदास पंडित पाटील यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी सौ सपना पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरुन दिनांक 16 मार्च 2022 रोजी अपात्र ठरविले आहे.

या बाबत सविस्तर वॄत असे बोरखेडा बु।। येथील सरपंच सौ सपना गुलाब पाटील यांचे सासरे श्री दादाजी त्र्यबक पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या मालमत्ता क्र 848 क्षेत्रफळ 464 या शासकीय जमिनीवर विना-परवानगी अतिक्रमण करुण राहत्या घराचे बांधकाम केल्यामुळे व त्याचा लाभ सरपंच हे एकत्र कुटुंबासह घेत असल्या मुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्री देवीदास पंडित पाटील यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-37/ 021. ने तक्रार दाखल केली असता त्यावर चौकशी व सुनावणी होऊन सरपंच यांचे सासरे यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे ग्रा.प. दप्तरी भोगवटा सदरी नाव लावुन घेतले आहे. व सदरची शासकीय जागा मिळकत ताब्यात ठेवून राहते घराचे बांधकाम केले आहे. सरपंच यांनी स्वत:शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले नसले तरी कुटुंब प्रमुख म्हणून सासऱ्याने जरी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असले तरीही सुन प्रत्यक्ष लाभार्थी ठरते व आहे. हा अँड विश्वासराव भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी सरपंच सौ सपना पाटील यांना ग्रा.प. सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निकाला मुळे ग्रामस्थां मध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले असुन जिह्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. तक्ररदार श्री देवीदास पंडित पाटील यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले. यांनी काम पाहिले. या निकालाकडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे