आपल खान्देश

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदेचे झाले तळोदा!

तळोदेचे झाले तळोदा; पहा कसा होता नामकरणाचा इतिहास

Apr 30, 2021

राजेश सोनवणे 

तळोदा (नंदुरबार) : तळोदे शहर नावाचा अपभ्रंश होऊन आता तळोदा असा उल्लेख वाढला आहे. असे असले तरी जुन्या नोंदीमध्ये व वयोवृद्ध नागरिकांचा लेखनात अजूनही तळोदे असेच लिहिलेले पहावयास मिळते. त्यात ज्या ऐतिहासिक कारणांसाठी तळोदे असे नामकरण शहराचे झाले होते ते देखील नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असे आहे. त्याची चर्चा अधून मधून जाणकार व वयोवृद्ध नागरिक करीत असतात. मात्र तो इतिहास जपण्याची गरज आहे. दुसरीकडे इंटरनेटवर शहराचा शोध घेतला तर आजही अनेक वेबसाइटवर तळोदे असाच उल्लेख आढळत माहिती उपलब्ध होते. त्यामुळे तळोदे की तळोदा उल्लेख करावा असा संभ्रम आजही कायम आहे.

तळोदे हे खानदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. त्यात बारगळ जहागीरदार यांच्या जहागिरीमुळे खानदेशात तळोद्याची एक वेगळी ओळख आहे. मुघल व त्याआधीचा काळातही तळ देण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून येथील परिसराची ओळख होती. एकीकडे इंदोर तर दुसरीकडे दक्षिणेकडील नाशिक पुण्यापर्यंतच्या प्रदेशात या ऐतिहासिक गुणांनी या ठिकाणाचे आपले स्थान अबाधित राखले होते. असे झाले होते नामकरणतळोदे असे शहराचे नामकरण कसे झाले; याबद्दल दोन आधार सांगितले जातात. त्यातील पहिला आधार म्हणजे पाचशे ते आठशे वर्षांच्या इतिहासात विविध राजवटीमध्ये सैन्यदलाला दक्षिणेकडून उत्तरेकडे कूच करावयाचे असल्यास काही ठिकाणी तळ द्यावे लागत होते. तळोद्याच्या परिसर आधीपासून भरपूर पाण्याने समृद्ध असा असल्याने मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे येथे राहण्यासाठी योग्य जागा होती. त्यात दक्षिणेकडून येणाऱ्या सैन्याला उत्तरेकडे जात असताना सातपुड्याच्या पर्वतरांगा पार कराव्या लागत असल्याने ते आराम करण्यासाठी तळोद्याला तळ देत असत तर सातपुडा उतरून पुन्हा दक्षिणेकडे जावयाचे असल्यास पुन्हा आराम करण्यासाठी तळ द्यावा लागत असे. तेच तळ देण्याचे ठिकाण म्हणजेच तळोदे असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे