ब्रेकिंग

सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून फूड कंपनीविरोधात निषेध

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची एका जाहिरातीत खिल्ली उडवल्याप्रकरणी मुंबईतील स्टोरिया फूड कंपनी कार्यालयासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केलीत. कोरोना संकटामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. त्याचाही विचार न करता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टोरिया फूड्सविरोधात मोर्चा उघडला. या प्रकरणात पोलिसांनी कोरोना संकटात कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी 8 जणांना अटक केली

निषेध नोंदवणारे कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणाले की, स्टोरिया फूड्सने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नुकत्याच एका जाहिरातीत खिल्ली उडविली. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील स्टोरिया फूड्स कार्यालयासमोर निषेध केलाय. त्यांच्या निषेधावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

महाराष्ट्रात दररोज वाढत्या कोरोनाचे प्रकरण लक्षात घेता कलम 144 लागू केलाय आणि लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि 8 जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध आपत्कालीन कायदा आणि एनडीएमएच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खिल्ली उडविनारी जाहिरात

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे