आपल खान्देश
पाचोरा तालुक्यातील गाळण येथील व्यक्तीचा सर्प दंशाने मृत्यू!
झूम मराठी
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील गाळण येथे शेतात काम करत असतांना अरूण मोहन वाडेकर ५० वर्षीय व्यक्तीला सर्प दंश झाल्याने उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अरूण मोहन वाडेकर (वय-५०) रा. गाळण ता. पाचोरा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी शेतात किरकोळ कामे करत असतांना त्यांना सापाने घेतला त्या दरम्यान, त्यांच्या सोबत असलेला त्यांचा भाचा प्रविण उत्तमराव वाघ यांनी तातडीने मामाला खासगी वाहनाने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले. डॉक्टरांच्या तपासणी वरून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



