आपल खान्देश

कुसुंब्यात आईच्या स्मरणार्थ जलसेवाचे लोकांर्पण

झूम मराठी न्यूज वेब मीडिया टीम

दिलीप परदेशी

कुसुंबा – कुसुंब्यातील प्रसिद्ध शिक्षक जगदिश चैत्राम परदेशी (नानु मास्तर )यांच्या मातोश्री कै.तुळसाबाई चैत्राम परदेशी यांचे आज प्रथम पुण्यस्मरण निमित्त कुसुंबा गोताणे रस्त्याला असलेले तुलसी फार्म येथे स्व. तुळसाआई च्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त जलसेवा केंद्राचे लोकार्पण कार्यक्रम व गरजूंना कपडे व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप आयोजित करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरण नाना शिंदे , धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील , मुकेश भाऊ धनगर , कुसुबा व गोताने ग्रामस्थ उपस्थित होते..

दररोज शेकडो लोकांची वर्दळ असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यासाठी विसावा म्हणून पादचाऱ्यांसह, कामगार, कष्टकरी, फेरीवाले, प्रवासी, तसेच पक्षी व मुक्या प्राण्याची तहान भागेल अशा साऱ्यांनाच तलान भागविण्यासाठी पाणपोईंचा आधार मिळेल असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे केले.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळेल असे मत जगदीश परदेशी सरांनी व्यक्त केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे