आपल खान्देश

शेकडो प्रयत्नांनंतर 10 वर्षांनी मिळाले शेतकऱ्याला आधारकार्ड!

इगतपुरी (नाशिक) : विविध शासकीय योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. असे असले तरी तालुक्यातील निनावी गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना शेकडो प्रयत्न करूनही आधारकार्ड मिळत नव्हते.

शेकडो प्रयत्नांनंतर 10 वर्षांनी मिळाले शेतकऱ्याक) : विविध शासकीय योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. असे असले तरी तालुक्यातील निनावी गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना शेकडो प्रयत्न करूनही आधारकार्ड मिळत नव्हते.

एक वर्षात किमान दोन लाख रुपयांचे नुकसान२०११ पासून आजपर्यंत त्यांनी शेकडो आधार केंद्रे ते मुंबईचे कार्यालय गाठूनही त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन तर केव्हाच बंद झालेले आहे. एक वर्षात त्यांचे किमान दोन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडून आधार मिळावे म्हणून त्यांनी अनेक खेटा घातल्या. मात्र, त्यांना आधार नसल्यामुळे निराधार व्हायची मात्र वेळ आली होती. अखेर घोटी येथील आधार केंद्राचे संचालक अंकुश जाधव यांच्या अविरत प्रयत्नांना यश येऊन शंकर गायकवाड यांना आधार मिळाले. गायकवाड यांनी अंकुश जाधव यांचे आभार मानून आनंदोत्सव साजरा केला. शंकर गायकवाड कष्टकरी शेतकरी आहेत. कष्टामुळे त्यांच्या हाताचे ठसे पूर्णपणे पुसून गेले आहेत. २०११ पासून त्यांनी जिल्ह्यातील विविध आधारकार्ड सेंटरला खेटा घातल्या. दहा वर्षांपासून आधारकार्ड मिळावे म्हणून अविरत प्रयत्नदहा वर्षांपासून ते आधारकार्ड मिळावे म्हणून अविरत प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडे शेकडो आधारच्या पावत्या असून, आधारच्या मुख्य कार्यालयाकडून त्यांचे आधार प्रत्येक वेळी नाकारले जात होते. अखेर आधार केंद्राचे संचालक अंकुश जाधव व मयूर पहाडिया आणि शंकर गायकवाड यांची भेट झाली. गायकवाड यांचे संपूर्ण प्रकरण समजावून घेत श्री. जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा प्रक्रिया केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले.

आधार नसल्याने काय काय सोसले आहे, याची आठवण आली तरी शहारे येतात. अनेकांच्या सांगण्यावरून आधारकार्डसाठी शेकडो ठिकाणी फिरलो आहे, पण यश येत नव्हते. अंकुश जाधव यांनी नियमाप्रमाणे मला आधार मिळवून दिले. आता दहा वर्षांनंतर आधार मिळाल्याने निराधार राहिलो नाही याचा आनंद वाटतो”.

-शंकर गायकवाड, शेतकरी, निनावी

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे