डॉ मनोज पाटील यांना आदर्श मुख्यध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य म्हणून त्यांनी मागील पाच वर्षा पासून जे काम केले आहे त्या बळावर त्यांना हा सन्मान झाला
- दिलीप जय परदेशी
पाचोरा (वृत्त विशेष) शिंदे मेडिकल रिसर्च इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ मनोज पाटील यांना पाचोरा शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अधिवेशनात स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते “आदर्श मुख्यद्यापक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ मनोज दिलीप पाटील यांनी कोरोना काळात कोवीड -19 यावर लेख लिहून ऑनलाईन प्रसिद्ध केला होता त्या लेखा मुळे जगभरातील तज्ज्ञांना कोरोना वर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले, तसेच त्यांनी ट्रान्सडरमल प्याचेस च्या डिझाईन चे इंडियन पेटंट मिळवले आहे, तसेच विविध 5 पेटंट त्यांच्या नावावर आहेत, फार्मसी मध्ये त्यांचे फार्मा सुटिकल केमिस्ट्री, क्वालिटी अँशुरांस तसेच फार्मास्युटिकल जुरिस्प्रूडेनस या विषयांवर पुस्तक लिहले आहेत. तसेच त्यांचे इंटरनेशनल जर्नल्स मध्ये 15 पेपर प्रकाशित झालेले असून भारतीय जर्नल्स मध्ये 20 पेपर प्रकाशित झालेले आहेत.
डॉ मनोज पाटील हे विविध सामजिक कार्यात अग्रेसर असतात ते त्यांच्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवस हा अंध व अपंग विद्यार्थ्यांन सोबत करत असतात, डॉ मनोज पाटील यांनी फार्मसी मधील सर्वात महत्वाची GATE परीक्षे मध्ये त्यांनी 97 पर्सेंटाइल मिळवून गोव्या सारख्या ठिकाणी मास्टर ऑफ फार्मसी चे शिक्षण घेतलेले आहे.तसेच त्यांनी जळगांव जिल्ह्यात जवळ पास पाच नवीन फार्मसी कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रा चे दालन उघडुन दिले, प्राचार्य म्हणून त्यांनी मागील पाच वर्षा पासून जे काम केले आहे, या सर्व गोष्टींची दखल घेऊन पाचोऱ्यातील अधिवेशनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांनी डॉ मनोज पाटील यांना ‘आदर्श मुख्यध्यापक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.




