आपल खान्देशमहाराष्ट्र

MahaVikas Aghadi Protest : पाचोऱ्यात भर पावसात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन.. 

पाचोऱ्यात भर पावसात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मुक आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्हातील पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भर पावसात तोंडावर काळ्या फिती बांधत हे आंदोलन केले. यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिला अत्याचारा विरोधात कडक कायदा करण्याची मागणी केलेय.

आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्याचा सन्मान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली म्हणून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ याकडे सरकारने लक्ष वेधले पाहिजे म्हणून सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून एक दिवसाचा काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शिवसेना उबाठा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात काँग्रेस सह शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडाला व काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेऊन महायुती सरकारचा निषेध नोंदवला यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाउस सुरु असतांना या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या आंदोलनाला काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख सुनील पाटील, नेत्या वैशाली सुर्यवंशी, कॉग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकीरा, प्रदीप पाटील, इरफान मनियार,महीला जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे,कल्पेश येवले, रविंद्र पाटील, प्रकाश सोनवणे, संदीप कोळी शिवसेना उबाठा चे उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, अॅड अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सांवत, अॅड दिपक पाटील,  भरत खंडेलवाल, विकास वाघ, खंडु सोनवणे, मनोज चौधरी, संदीप जैन, हरी पाटील, राकेश सोनवणे , अभिषेक खंडेलवाल, गजु पाटील, आवेश खाटीक, गजु सावंत, शशिकांत पाटील, नितीन खेडकर, आदी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भरपावसात आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाची चर्चा जोरदार शहरात होती. आंदोलनात काळे झेंडे आणि काळ्या फिती लावण्यात आले होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे