बदलापूरात राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने धनगर बांधावानीं केले अभिवादन..
बदलापूर | राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने येळकोट येळकोटच्या घोषणा देत समाजबांधवांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थिती होता.
राजमाता अहिल्याबाईनी आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, विहिरी खोदल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केले. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली. आजही देशभरातील अनेक गावात, मंदिराच्या ठिकाणी अहिल्यादेवीनी केलेले कार्य मराठी माणसाची मान उंचावत उभे आहे.
बदलापूर शहरात राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने येळकोट येळकोटच्या घोषणा देत समाजबांधवांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी ज्ञानेश्वर गोटू परदेशी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेविका सौ. प्रमिलाताई पाटील यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी ज्येष्ठ समाजसेवक व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे सल्लागार व मार्गदर्शक बापूसाहेब हटकर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , बदलापूर शहर माजी नगराध्यक्ष वामन शेठ म्हात्रे यांच्या सह अनेक मान्यवरानी अहिल्यादेवीना वंदन केले, तसेच निलेश येडवे (कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी,महाराष्ट्र राज्य) व निर्वी गणेश गढरी यांनी ही राजमाते बद्दल आपले मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.समाज बांधवांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल रवींद्र फकिरा परदेशी व रमेश परदेशी यांनी प्रमुख पाहुणे व समाज बांधव यांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश विठ्ठल गढरी, राजेंद्र गढरी यांनी विषेश मेहनत घेतली.


