ब्रेकिंग

प्राथमिक शिक्षकांच्या 15 दिवसांत बदल्या; तक्रार निवारण सभेत आमदार तांबेंनी सूचना दिली…

 

धुळे (झूम मराठी) पंधरा दिवसांत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होतील, अशा सूचना आमदार तांबे यांनी तक्रार निवारण सभेत दिल्या. धुळे जिल्हा परिषदेत नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षकांची तक्रार निवारण सभा झाली. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉ. बोडके, तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, लिपिक उपस्थित होते.

तक्रार निवारण सभेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या येत्या पंधरा दिवसांत करण्याची आमदार तांबे यांनी सूचना केली. यासोबतच जिल्ह्यातील शाळांची शनिवारची वेळ सकाळी करण्यात यावी. लवकरच त्याबाबत शिक्षण संचालक यांच्याकडे बैठक घेऊन तो विषय मार्गी लावण्यात येईल, असे तांबे यांनी आश्वासित केले.

 समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय खैरनार, राजेंद्र पाटील, साहेबराव गिरासे, प्रवीण भदाणे, भूपेश वाघ, श्यामकांत अहिरराव, प्रभाकर मेटकर, राजेंद्र नांद्रे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर कंखर, शरद युवराज पाटील, महेंद्र बोरसे, बापू पारधी, दत्तात्रय पाटील, हृषीकेश कापडे, संजय वाघ, नगराम जाधव, अनिल चौधरी, छोटू राजपूत, रूपेश जैन, सुनील पाटील, धीरज परदेशी, संतोष जाधव, सागर पवार, देवेंद्र पाटील, तुषार महाले, अमोल शिंदे, सुहाग सोनवणे, जयसिंह भुईटे, संजय पोतदार, गमन पाटील, अनिल अहिरे आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे