माजी खासदार विकास महात्मे साहेब,आपला आक्रोश नेमका समाजासाठी आहे स्वतःला पद मिळवण्यासाठी?
माजी खासदार विकास महात्मे साहेब,आपला आक्रोश नेमका समाजासाठी आहे स्वतःला पद मिळवण्यासाठी?हा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहॆ
०६ नोव्हेंबर रोजी माजी खासदार विकास महात्मे यांनी आयोजित केलेला धनगर आक्रोश मेळावा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यात आला,त्यावेळी सर्वप्रथम मनात एक प्रश्न आला की डॉ.महात्मे यांचा हा आक्रोश समाजासाठी आहे की स्वतःच्या पदासाठी? त्याच कारण म्हणजे डॉ.विकास महात्मे ज्या पक्षात काम करतात,त्या भारतीय जनता पार्टीची सध्या गल्ली ते दिल्ली सत्ता आहे.स्वतः महात्मे याच पक्षाकडून 6 वर्ष राज्यसभेवर होते.मग हे नेमकं कोनाविरुद्ध आक्रोश आंदोलन करत आहेत,ते अगोदर स्पष्ट करावे ?
डॉ.महात्मे यांनी समाजाला वेड्यात काढायचं बंद करावं,अगोदर 6 वर्ष खासदार असताना समाजासाठी काय काय केलं याचं उत्तर द्यावं.महात्मे ज्या पक्षात काम करतात,त्या पक्षाच्या नरेंद्र मोदी,देवेंद्र फडणवीस यांना भेटून या सर्व मागण्या मान्य करून घ्याव्यात अन्यथा समाजाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी अगोदर पक्षातून बाहेर पडावे मग ही आंदोलनाची थेर करावीत.
2014 नंतर जशी समाजाच्या नावाने डॉ.महात्मे यांनी खासदारकी गळ्यात पाडून घेतली तसाच आता काहीतरी मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय.
समाजाच्या नेत्यांना एखाद्या पदावर असताना समाजाचे हित दिसत नाही परंतु सत्ता जाताच समाजाचे प्रश्न दिसू लागतात.समाज आता जागृत आहे आणि यांची ही थेर खपवून घेतली जाणार नाहीत.वयक्तिक फायद्यासाठी समाजाचा वापर करण्याला विरोध होणारच.
https://www.facebook.com/100056788909143/posts/pfbid0eJ9pcUzDxTb9vdYKu2HDY9F2jxDXP88rMgQC3sw88nUQtV6JrAdQSst4xUh9CKiQl/



