पाचोऱ्यात संत नामदेव महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
- दिलीप जय परदेशी
पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळादीना निमित्ताने अभिवादन करण्यात आले, यावेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
संतांच्या चरणधूळीचा लाभ व्हावा म्हणून ‘ नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।। असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली.
संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय मंडळ आयोजित अभिवादन करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार कविताताई पगार लखमापुरकर जि. नाशिक यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. श्रीमती कविता ताई यांचे स्वागत डॉ. किर्ती शिंपी यांनी केले व शितल व अनिता सोनवणे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावर्षी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री बी सी खैरनार यांचे शुभहस्ते व दीपप्रज्वलन रजनीताई नेरपगार व अरुण वसंतराव शिंपी यांचे हस्ते करण्यात आले, तसेच महापुजा रवींद्र खैरनार यांच्या परिवाराकडून करण्यात आली. त्यानंतर अल्पोपहार व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम समिक्षा पियूष शिंपी यांचे हस्ते करण्यात आला, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला. ईयत्ता १० वी ,१२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. गिरीष जगताप यांनी सदर कार्यक्रमात रक्कम रु. ५०००/- मंडळास त्यांचे वडील कै. वसंतराव जगताप यांचे स्मरणार्थ देवु केली आहे. सदर रक्कम बँकेत मुदत ठेव ठेवून येणारे व्याज ची रक्कम इयत्ता १२ वी सायन्स मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास देणेत यावी असे जाहीर केले,
- योगेश सोनवणे यांची समाज अध्यक्षपदी निवड
शिंपी समाजातील समाजसेवा योगेश मु. सोनवणे यांची समाज अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष यांचा मावळते अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी एकमेकांचा सत्कार केला. त्यांच्या कडील पदभार नव निर्वाचित अध्यक्ष यांच्या कडे सोपविण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप शिंपी यांनी केले व कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.




