आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

युवा पत्रकार आणि टाइम्स नाऊ डिजिटलचे प्रतिनिधी हर्षल भदाणे यांचा धुळ्यात अपघातात निधन

टाइम्सनाऊचे प्रतिनिधी हर्षल भदाणे यांच्या अपघातात निधनाने पत्रकारितेला मोठी हानी  नवी मुंबईतील युवा पत्रकार आणि टाइम्स नाऊ डिजिटलचे प्रतिनिधी हर्षल भदाणे यांचे आज धुळे येथे अपघाती निधन झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे हर्षल यांचे अकाली जाणे संपूर्ण पत्रकारितेसाठी मोठी हानी आहे.

https://x.com/DILIPJP21411/status/1818180762954334671?t=llfKJ_GgetJZ2pkgSajMGg&s=19

धुळे येथे झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबईतील पत्रकार हर्षल भदाणे-पाटील यांचे सोमवारी अपघाती निधन झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्याच्या पोलिस अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केल्याचे समजते.

धुळे-संभाजीनगर महामार्गावर गरताड गावाजवळ एका भरधाव ट्रकने हर्षल यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. भरधाव ट्रक कारला धडक देऊन धुळे शहरात घुसला. मालेगाव रोडवर शिवाजी महाराज चौकात ट्रक चालकाने आणखी चार दुचाकी चिरडून ट्रक सोडून पळ काढला. यावेळी संतापलेल्या जमावाने ट्रकची तोडफोड केली. या अपघातात हर्षल यांचा मृत्यू झाला.

हर्षल हे केवळ एक पत्रकार नव्हते, तर एक संवेदनशील आणि कणखर व्यक्तीमत्व होते. त्यांच्या पत्रकारितेतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने आपण एक होतकरू पत्रकार गमावला आहे. हर्षल यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमंडळींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे