आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

भुसावल लोहारा बस शहापूरा मार्गे सुरु झाल्याने नागरिकांनी केला आनंद व्यक्त..


  • दिलीप राजपूत प्रतिनिधी 

भुसावळ येथून निघणारी बस लोहारापर्यंत येजा करत होती परंतु त्या बसचा उपयोग शहापूरा येथील विद्यार्थ्यांना होत नव्हता यासाठी लोहारा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके, पर्यवेक्षक पी एम सुर्वे यांनी भुसावल आगर प्रमुख शिवदे यांना लेखी निवेदन देऊन ही बस शहापूरा पर्यंत येण्याचे निवेदन करण्यात आले.

भुसावल लोहारा बसचा शहापूरा येथील विद्यार्थ्यांना उपयोग होईल त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब निदर्शनास आणून आगार प्रमुख शिवदे साहेब यांनी सुद्धा या गोष्टीची त्वरित दखल घेऊन पाचोरा लोहारा असणारी बस ही शहापूरा पर्यंत नेण्यास परवानगी दिली त्याबद्दल विद्यालयाच्यावतीने या बसचे वाहक व चालक दीपक शांताराम सोनवणे के व्ही हिवराळे यांचा शहापूरा येथे  पुष्पगुच्छ देऊन गावातील सरपंच योगेश परदेशी, गजानन माळी, राजेंद्र परदेशी, दिलीप राजपूत, संदीप परदेशी, भगवान परदेशी, ईश्वर परदेशी, नथ्थू परदेशी, पत्रकार दिलीप राजपूत, गावातील महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी बस पूजनासाठी उपस्थित होत्या.

यावेळी विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव भाऊ पाटील उपाध्यक्ष अ अ पटेल सर तसेच स्थानिक सल्लागार समिती सदस्य डॉक्टर देवेंद्र शेळके विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एस एस गुजर वाय पी वानखेडे बी एन पाटील उपस्थित होते ही बस सुरू व्हावी यासाठी विद्यालयाच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला तसेच राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन व संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांचे अनमोल सहकार्य लाभले याबद्दल विद्यालयाच्या वतीने भुसावल आगार प्रमुख यांचे आभार मानण्यात आले विद्यार्थिनींना शासन नियमानुसार मोफत पासेस मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा पासेस मिळतील विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक पी यू खरे सर व किरण बारी सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यामुळे गावातील पालकांनी सुद्धा बस सुरू झाल्यामुळे आनंद व्यक्त केलेला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे