पाचोरा शहरात अपघात रोखण्यासाठी वेग नियंत्रक बसवल्याने, नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
- दिलीप जय परदेशी
पाचोरा तालुक्यातील रस्त्यावर रोज अपघाताची मालिका सुरुच होती हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन कामाला लागले होते, वाहतूक नियंत्रण अधिकारी आणि न्हाई (NHAI) यांच्या मार्फत सर्वे करण्यात आला आणि ज्या ठिकाणी धोकेदायक ठिकाण आहे त्या ठिकाणी वेग नियंत्रक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात आल्याने आनंद व्यक्त झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे.
पाचोरा तालुक्यातील राज्य महामार्ग 19 (राष्ट्रीय महामार्ग 753J) यावर जेव्हा पासून काँक्रेटीकरण झाले तेव्हापासून अपघात वाढायला लागण्याने अनेकदा तक्रारी आल्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सदर महामार्गाचा वाहतूक नियंत्रण विभाग आणि न्हाई (NHAI) यांच्या मार्फत काही दिवसापूर्वी सर्वे करण्यात आला आणि ज्या ठिकाणी धोका आहे त्या धोकेदायक ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक, रम्बलर स्ट्रीप (वेग नियंत्रक) टाकण्याचे काम आरटीओ अधिकारी हेमंत सोनवणे यांच्या नियंत्रनात सुरु करण्यात आले असल्यामुळे सर्वसाधारण नागरिकांनी व प्रवास करणारे, व वाहन धारकांकडून समाधान व्यक्त होत असतांना दिसून येत आहे.




