महाराष्ट्र
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट…
मुंबई (वृत्तसेवा) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीगणरायाचे दर्शन घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले. pic.twitter.com/dEDQBnRsB7
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2022



