आपल खान्देशसखी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी पाचोऱ्यात महिला मेळावा संपन्न..

मेळाव्यात महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

पाचोरा (CM Majhi Ladki Bahin Yojana) : राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलासाठी अतिशय कल्याणकारी ठरणारी योजना (CM Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शिवसेनाच्या वतीने महिलांसाठी मार्गदर्शन व महिला सशक्तीकरन मेळाव्यांचे आयोजन  पाचोरा समर्थ लॉन्स येथे करण्यात आले होते,  महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडणार हा महायुती सरकारचा वादा असल्याची ग्वाही पाचोरा भडगावचे शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

पाचोरा भडगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात महिला मेळाव्याचे आयोजन समर्थ लॉन्स येथे करण्यात आले होते. या महिला मेळाव्यात शहरातील हजारो महिला उपस्थित होत्या, मेळाव्याच्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी प्रचंड कल्याणकारी योजना अमलात असून या योजनेचा प्रत्येक भारतीय महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित महिला वर्गांना केले. केंद्र शासनाने महिलांसाठी उज्वला मोफत गॅस व नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Majhi Ladki Bahin Yojana) व प्रति वर्षाला अन्नदान योजनेअंतर्गत तीन गॅस मोफत देण्याची योजना यासह संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यासह इतर असणार्‍या महिलांसाठी कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व मोदी सरकारने देशातील महिलासह इतर कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ दिला तर नवर्‍याच्या पतीवर पत्नीचाही कायम हक्क राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता महिलांनी अन्याय अत्याचाराच्या बळी पडू नये त्यांनी कृतृत्ववान व स्वाभिमानी जीवन जगून निर्भीडपणा जपला पाहिजे तरच महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच महिला भगिनींना त्रास कमी व्हावा यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या पाचोरा , भडगाव , नगरदेवळा , कजगाव , नांद्रा , कोळगाव , वाडे , पिंपळगाव , वरखेडी व कनाशी येथील जनसंपर्क कार्यालयात महिला भगिनींसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे