लोहारा येथील शाळेत विद्यार्थिनींना मोफत शालेय बस पासेस वाटप
- दिलीप राजपूत प्रतिनिधी लोहारा
लोहारा धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना मोफत शालेय बस पासेस वाटप करण्यात आले या उपक्रमाचा परिसरात कौतुक होतांना दिसत आहेत.
लोहारा येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 6/07/2024 रोजी लोहारा विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या म्हसास व रामेश्वर तांडा येथील विद्यार्थिनींना एस टी महामंडळातर्फे मोफत शालेय बस पासेस चे वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका यु डी शेळके, उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे,पर्यवेक्षक पी एम सुर्वे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयातील उपशिक्षक पी यू खरे सर, किरण बारी सर, यांनी विद्यार्थिनींना मोफत शालेय बस पासेस काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्याबद्दल विद्यालयाचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.



